सोलापूर : काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे सोलापुरात स्वागत आहे असे सांगत त्यांना सोलापूरचे शिक कढई फार आवडेल असे वक्तव्य करत असे पक्ष देशावर राज्य करू शकत नाही असा चिमटा ही त्यांनी घेतला.
सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी धर्मराज काडादी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, मी देशाचा गृहमंत्री असतानाच आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य माझ्या सहीने निर्माण झाले. त्यांची काय स्थिती होती हे सुद्धा मला माहित आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांची काही ताकद नाही असे लोक सुध्दा येतात परंतु ते देशावर कधीच राज्य करू शकत नाहीत असे सांगताना सोलापुरात येऊ द्या आपण त्यांचे स्वागत करू, त्यांना सोलापूरची प्रसिद्ध शीक कढई फार आवडेल अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.



















