सोलापूर : सोलापूरचे दोन प्रमुख प्रशासकीय अधिकारी सध्या पांडुरंगाच्या चरणी सेवेत पूर्णतः सक्रिय आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे तर थेट आपल्या दिड महिन्याच्या रजेनंतर परदेशातून येत पांडुरंगाच्या सेवेत रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे तर संपूर्ण कुटुंब वारीमध्ये तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आषाढी एकादशीच्या तोंडावर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही वारीला वाहून घेतले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी ही वारीचे योग्य नियोजन केल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे 24 दिवसांच्या प्रशासकीय ट्रेनिंग साठी मसुरीला गेले होते, त्यानंतर लगेच आणखी काही दिवस ते परदेशी गेले या दीड महिन्या नंतर ते 22 जून रोजी सोलापुरात दाखल झाले, त्यांनी पुण्याहून कार्यालयात न येता थेट पंढरपुरात पालखी मार्ग पाहणी केला आणि पांडुरंगाच्या चरणी सेवेत रुजू झाले आहेत, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे त्यांनी वारकरी वेशात जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने मनोभावे स्वागत केले. शनिवारी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतावेळी शंभरकर यांच्या पत्नी सुद्धा वारीमध्ये सहभागी झाले आहेत यावेळी त्यांनीही डोक्यावर तुळस घेतली होती तर शंभरकर यांनी खांद्यावर वीणा घेत वारीत सहभाग नोंदवला.
सीईओ दिलीप स्वामी हे तर अध्यात्मिक आहेत. आषाढी वारी म्हणजे जिल्हा परिषदेची मोठी जबाबदारी असते. जिल्हा परिषदेची सुद्धा संपूर्ण टीम वारीमध्ये सेवा देत आहे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनीही वारीच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे.
दिलीप स्वामी हे तर पत्नी आणि दोन मुलींसह वारीमध्ये सहभागी झाले आहेत. संपूर्ण कुटुंब वारकर्यांसोबत तल्लीन झाल्याचे पहायला मिळते. स्वामी हे वारकरी वेशात असून गळ्यात पखवाज घेत सहभागी झाले आहेत, त्यांच्या पत्नी डोक्यावर तुळस घेऊन तर त्यांच्या मुली हातात टाळ मृदंग घेऊन वारीत सामील झाले आहेत. यावरून त्यांनी वारीला वाहून घेतल्याचे दिसून येते.



















