Thursday, August 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जगद्गुरू संत तुकाराम महाराज सोलापूर जिल्ह्यात येताच सर्वदूर पावसाचे आगमन ; नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर  :-  चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत ‘भक्ती रसात’  चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. 

हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे.

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी  पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला.

पालकमंत्र्यांनी केले सारथ्य

पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासू पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  यावेळी रथात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते.

पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली.  यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले.  तद्नंतर गळ्यात वीणा घेऊन पालकमंत्री श्री. विखे पाटील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी वारकरी भविकासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत

अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले. 

नेत्रदीपक रिंगण सोहळा

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात  झाले.  पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन  केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा  याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व  आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला. 

अमेरिकन राजदूताची उपस्थिती

सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा  सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे  आवर्जून उपस्थितीत होते. 

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,उपविभागीय अधिकारी नामदेव  टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी, वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात इतका पाऊस पडला की, अनेक दुचाकी गाड्या वाहून जाता जाता लोकांनी वाचवल्या ; गणेश शॉपिंग सेंटर जवळील व्हिडिओ पहा

Next Post

अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या प्रसंगावधानाने वाचले वारीतील एका माऊलीचे प्राण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या प्रसंगावधानाने वाचले वारीतील एका माऊलीचे प्राण

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996571
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group