सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरचा आढावा घेण्यासाठी सोलापूरच्या विमानतळावर उतरून शासकीय वाहनाने ते पंढरपूरला जाणार आहेत. त्यांचे आगमन सोलापूरच्या विमानतळावर दुपारी तीन वाजता होते, सव्वा पाच वाजले तरी त्यांचे विमान अद्याप आले नव्हते.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने होडगीरोड विमानतळ समोरील डाव्या बाजूची अनेक दुकाने बंद करायला लावली आहेत. दुपारी दोन पासून ही दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले आहे. दुपारी दोन ते सहा पर्यंत दुकान अजिबात उघडायची नाहीत अशी तंबी या सर्व दुकानदारांना पोलिसांनी भरल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी दुकानदारानी तीव्र असा संताप व्यक्त केला आहे. विमानतळावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणी मंत्री आला तर अशा प्रकारे पोलीस प्रशासन दुकाने बंद करायला लावतात आणि त्यामुळे आमचे मोठे नुकसान होते अशी ओरड आता सुरू झाली आहे.
याप्रकरणात एडवोकेट रियाज शेख यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. मंत्र्याचा कॅनवा जाताना दहा मिनिटे नागरिक थांबतात तेव्हा कुणाला काही वाटत नाही मात्र चार चार तास जर दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना असतील तर त्यांचा होणारा घाटा कोण भरून देणार? आणि दुकाने बंद करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


















