महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांची फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्र पादाक्रांत करणे एवढे सोपे नाही. सत्ता आणि संपत्तीच्या प्रदर्शनाच्या जोरावरती आपण महाराष्ट्र जिंकू शकू असे जर त्यांना वाटले तर तो त्यांचा गैरसमज आहे. के सी आर यांच्या योजनांच्या मध्ये सत्य आणि तथ्य कमी आणि शोबाजी खूप जास्त असते. पांडुरंगाच्या स्वागताला सहाशे गाड्यांचा ताफा कशा साठी?सर्वसामान्य भाविकांच्या प्रमाणे त्यांनी यावं त्यांचे स्वागत आहे. शोबाजी करत असतील तर त्याला महाराष्ट्राची प्रगल्भ जनता बळी पडणार नाही असं प्रतिपादन शिवसेनाप्रवक्ता प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केले.


















