Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपाखाली नियुक्तीपत्र मुलांच्या हातात पडताच माय माऊलींचे डोळे पाणावले..! ; CM एकनाथ शिंदे म्हणाले हे सर्व साध्य झाले आहे ते….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वातंत्र्याची 75 वर्षनिमित्त एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प अंतर्गत अनुकंपा नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, आमदार अजयशेठ गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महसूल विभागातील वैभव कट्टे संदीप पवार, फैजान चिस्ती, राकेश वेदपाठक, राणी साबळे, अब्दुल मोईज सय्यद, अभिषेक जमादार, अंकिता साठे, नोंदणी व मुद्रांक विभाग शिल्पा सुरवसे, अंजली रेवजे, सार्वजनिक बांधकाम विभागातील संभाजी खांडके, सिद्धनाथ हाक्के, सचिन शिंदे, सदाशिव पिसे, तानाजी कांबळे, अभिजीत कन्हेरकर, अझहर पठाण व सौरभ जानकर या अठरा जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती पत्र,  श्री.विठ्ठल-रूक्मिणी व पुष्प गुच्छ देण्यात आले. नियुक्तीपत्र हातात पडताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण 75 हजार नोकऱ्यांची घोषणा केली नुसती घोषणा करून आम्ही थांबलो नाही तर दर कॅबिनेटच्या वेळेस आम्ही नियुक्तीपत्र वाटप करतो. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याला राज्यातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कचेरी मध्ये नागरिकांना दाखले घेण्यासाठी येऊ नये म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून त्यांना लागणारे सर्व दाखले, प्रमाणपत्र त्याच ठिकाणी हातामध्ये दिले जातात. याचा सर्वसामान्य माणसांना फायदा होत आहे.

सांगायला अभिमान वाटतो की जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, सीईओ, बीडिओ हे सर्व गावागावात दिसत आहेत, लोकांच्या नोंदणी करताहेत, लाभार्थ्यांना शोधत आहेत, त्यांची नोंद घेऊन सन्मानपूर्वक स्टेजवर बसवत आहेत, हे आजपर्यंत कधीच घडले नव्हते. केवल शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे साध्य झाले.

आपल्या स्वागत व प्रास्ताविकात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार रोजगार निर्मितीचा शासनाचा मानस लक्षात घेऊन एक जानेवारी 23 पासून आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीतील गट क व गट संवर्गातील एकूण 59 उमेदवारांना  नियुक्तीपत्रे देण्यात आल्याची माहिती दिली.

अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकामी अपर जिल्हाधिकारी तुषार  ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे, वृषाली केसकर,अजिंक्य गोडगे, परिविक्षाधीन नायब तहसिलदार तुषार शिंदे यांनी काम पाहिले. सर्व नवनियुक्त उमेदवारांना  देण्यात आले. अशाप्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला.

SendShareTweetSend
Previous Post

CM एकनाथ शिंदेंना झेडपीच्या वारकरी फेट्याची क्रेझ ; राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः गिरीश महाजन व तानाजी सावंत यांना घातला फेटा ; पहा Video

Next Post

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने ऑल इंडिया समता सैनिक दलाने साजरा केला सामजिक न्याय दिन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने ऑल इंडिया समता सैनिक दलाने साजरा केला सामजिक न्याय दिन

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979018
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group