सोलापूर : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. एकीकडे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असताना सोलापुरात नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांकडून डॉक्टर आंबेडकर चौकातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष पवार यांच्या कार्यालयासमोर अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून हा आनंद साजरा केला. यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे, महेश निकंबे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















