सोलापुरात कोरोनाच्या महामारीत गेलेल्या एक वर्षानंतर कुठेतरी सोलापूर सावरतोय असे म्हणत असतानाच पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, याला जबाबदार जनताच म्हणावी लागेल. प्रशासन आपल्या परीने सर्व आवाहन करत नियम पाळण्याच्या सूचना वारंवार करत आलं आहे, मात्र किती जण हे नियम पाळतात हा सुद्धा प्रश्न कायम उपस्थित होतो. सोलापुरात संचारबंदीची भाषा होऊ लागली त्याच दरम्यान जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यांच्या पाचव्या दिवशीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह झाले, दोन प्रमुख अधिकारी कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तरीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सीईओ दिलीप स्वामी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत कामकाज केले, सोलापुरात 25 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रात्रीच्या संचारबंदीसह शाळा व कॉलेज बंद ठेवणे तसेच विविध नियम लावले यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर हे हजर नव्हते मात्र हॉस्पिटल मध्ये राहून त्यांचं सर्व प्रशासनाच्या हालचालीवर लक्ष होतं ते स्वतः पॉझिटिव्ह झाले मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना ही कोरोनाचा संसर्ग झाला त्यांनाही रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अशा मानसिकतेत त्यांनी स्वतःला व कुटुंबाला सावरत प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवून त्यांनी कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे ते सोमवारपासून आपल्या कर्तव्यावर पुन्हा हजर होणार आहेत, दोन वेळा त्यांनी कोरोना वर यशस्वीपणे मात केली आहे . सन 2020 चा कोरोनाचा संपूर्ण काळ आपल्या कुटुंब विना घालवताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचा प्रमुख म्हणून सोलापूर जिल्ह्याला या जागतिक महामारीतून बाहेर काढण्याच महत्वाचं काम त्यांनी केलं. पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरोना सारख्या महामारीला तोंड देताना सोलापूर शहर जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा चांगल्या पद्धतीने ते चालवताना दिसतात. शासन पातळीवर सोलापूरच्या नावाची व प्रशासकीय कामकाजाची विशेष नोंद घेतली जात आहे.



















