सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात जल्लोष केला. सोलापुरात सुद्धा त्यांच्या समर्थक संतोष पवार झुबेर बागवान आनंद मुस्तारे महेश निकंबे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मिठाईवाटून जल्लोष केला.
सोमवारी या सर्व कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये अजित पवार यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्र काढून सोलापूरचे युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांची पक्षातून आणि पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्ष विरोधी भूमिका घेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून बडतर्फ करत असल्याचे पत्र त्यांनी काढले आहे.

.jpg)

















