सोलापूरात 5340 विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व खबरदारी घेतली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २१ मार्चला घेण्यात आली. या परीक्षेसाठी सोलापूर शहरात २२ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली होती, 480 वर्गखोल्याचे नियोजन करण्यात आले प्रत्येक वर्ग खोल्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, या केंद्रावरून ८ हजार ८८० विद्यार्थी परीक्षा देणार होते. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी या परीक्षेदरम्यान केली गेली . ही परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी ६०५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले . परीक्षा केंद्र परिसरातील बंदोबस्तासाठी ११० पोलिस नियुक्त करण्यात आले होते. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात येऊन तसेच विद्यार्थ्यांची झाडाझडती करून त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना कोरोना रक्षणाचे बेसिक किट देऊन परीक्षेला आत सोडण्यात आले, त्या किट मध्ये हॅन्ड सॅनिटायझर्स, हॅन्ड ग्लोज, मास्क होते सोलापूरात एकूण 9 हजार किट उपलब्ध करुन देण्यात आले,
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी गट अ व ब या वर्गांकरिता ही परीक्षा झाली .एका वर्गात फक्त 24 विद्यार्थी,22 केंद्रातील 375 खोल्यांमध्ये परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती.एक बेंच एक विद्यार्थी अशी व्यवस्था,डावीकडे उजवीकडे एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था होती. सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होती.
सोलापूरात 8 हजार 880 पैकी 5 हजार 340 विद्यार्थी उपस्थित होते, 3540 गैरहजर राहिले अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी माहिती दिली.



















