सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे बुधवार पेठ परिसरातील बलदावा घर ते शिंगवे भवन परिसरामध्ये रस्त्यावर तीन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना अडचण होत असल्याची माहिती मिळाली. हे समजताच माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली तसेच नागरिकांना या रस्त्याचा वापर करू नका अशी विनंती केली आहे.



















