सोलापूर : मैंदर्गी येथील शिवचलेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मैंदर्गीरत्न ए. जी. पाटील काका यांचे काल रात्री उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे ते ८७ वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
जुळे सोलापूर भागात सर्वसामान्यांना अतिशय अल्प दरात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्णत्वास नेले, संतोष नगर, शांती नगर, विजय नगर, शिवगंगा नगर, कर्णिक नगर अशी सोलापूरातील अनेक नगरे त्यांनी वसवली, शांती इंग्लिश मीडियम स्कूल, ए जी पाटील इंजीनियरिंग कॉलेज यासारखे नामांकित शिक्षण संकुल त्यांनी उभारले. या निधनाबद्दल सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.



















