Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

करण म्हेत्रे यांना एक न्याय व राजीव सातव यांना दुसरा न्याय असे का? सोलापूरात या नेत्याने घेतला आक्षेप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




कै.करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेतील शोकाकुलांवर लावण्यात आलेले ३५३ सह अन्य गुन्हे मागे घेऊन अटक केलेल्या शोकाकुलांची तातडीने सुटका करावी व मोची समाज बांधव राहणाऱ्या परिसरात पोलीस प्रशासनाकडून होत असलेली अयोग्य कारवाई व अटकसत्र त्वरित रोखण्यात यावे.अशी मागणी महाविकास आघाडी सरकार मुख समन्वय मा.शरद पवार आणि राज्य सरकारकडे करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईत अनेक निष्पाप व कष्टाळू लोक अडकले आहेत.त्यांच्यासाठी स्वतः च्या मानधनातुन आर्थिक मदत दिली असून या प्रकरणी शासन आणि प्रशासन दरबारी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.


ते बोलताना पूढे म्हणाले की, सोलापूर शहरात राहणारे मयत करण म्हेत्रे यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या २५० शोकाकुलांवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय प्रशासन मार्फत ३५३ सह अन्य  कलमान्वये कारवाई सुरु आहे. हे प्रसंगोचित नाही. 

कै. करण म्हेत्रे हे मोची समाजातील अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रामुख्याने सोलापूर शहरातील लष्कर, बापुजी नगर, मोदी, फॉरेस्ट व अन्य परिसरात त्यांनी विषारी ताडीच्या विरोधात व्यसनमुक्ती आंदोलन करून अनेक तरुणांना दारू, ताडी, जुगार अशा वाईट प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घेत असत. यामुळे अनेक तरुणांशी त्यांची मैत्री, सहानुभूती, प्रेमळ नाते संबंध निर्माण झाले होते. त्यांनी तरुणांनी निरोगी व सुदृढ शरीर कमविण्यासाठी व्यायाम केले पाहिजे. म्हणून व्यायाम शाळेची निर्मिती केली. 

त्यांचे शनिवार दि. १५ मे २०२१ रोजी आकस्मित निधन झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व मित्र परिवाराला आश्चर्याचा धाका बसला. सर्वजण भावनिक झाले. १६ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून करण म्हेत्रे यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यासाठी अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्यासोबत मिळून काम केलेले अनेक तरुण आपसुकच शोकाकुल वातावरणात सहभागी झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला. या जन समुदायावर नियंत्रण न ठेवता आल्याने पोलिसांकडून हात उगारण्याचा प्रयत्न झाला. 


त्याच दिवशी रात्री उशिरा पोलीस आयुक्तालय मार्फत अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या २५० शोकाकुलांवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय प्रशासन मार्फत ३५३ सह अन्य कलमान्वये कारवाई सुरु केली. त्यानंतर करण म्हेत्रे हे ज्या परिसरात राहत होते तो संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले व तेथील स्थानिक लोकांवर पोलीस प्रशासनाचा दबाव वाढविला. सरसकट दिसेल त्या व्यक्तीला चौकशी करून ताब्यात घेऊ लागले. यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 


कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या अंत्य यात्रेत हजारो नागरिकांचा जमाव होता. तो जमाव स्मशान भूमीतही त्याच संख्येने जमले होते. त्या जमावर पोलीस प्रशासनामार्फत कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. परंतु सोलापूर शहरातील अत्यंत कष्टाळू, पापभिरू, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मोची समाज आहे. या समाजातील कै. करण म्हेत्रे यांनी या समाजातील तरुणांसाठी केलेले व्यसनमुक्ती व सामाजिक कार्य नक्कीच प्रेरणादायी होते. त्याने प्रभावित होऊन अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या शोकाकुलांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली धरपकडची कारवाई ही अनुचित आहे. एकंदरीत या कारवाईमुळे या समाजातील लोकांमध्ये पोलिसांकडून दडपशाही होत आहे. अशी संतप्त भावना व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता कै. करण म्हेत्रे हे लष्कर परिसरात राहणारे असून त्यांच्या पार्थिवावर मोदी येथील स्मशान भूमी येथे अंत्य संस्कार करण्यात आले. परंतु पोलीस प्रशासनाकडून लष्कर, मोदी, फॉरेस्ट, थोरला इरान्ना वस्ती, धाकटा इरन्ना वस्ती इत्यादी परिसरातील नागरिकांवर सरसकट कारवाई सुरु आहे. 


 वरील वस्तुस्थितीचा आणि मोची समाज बांधवांच्या भावनाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. तसेच सध्या सुरु असलेले अटक सत्र तातडीने रोखण्यात यावे. व  अंत्ययात्रेतील शोकाकुलांवर लावण्यात आलेले ३५३ सह अन्य गुन्हे मागे घेऊन अटक केलेल्या शोकाकुलांची तातडीने सुटका करण्यात यावी या मागण्याचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी शरद पवार,राज्यपाल,मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री,पालकमंत्री, पोलीस महासंचालक,जिल्हाधिकारी, सोमपा आयुक्त आदींना इमेल द्वारा पाठवल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार सोलापूर कोरोनाचा आढावा ; राज्यातील 17 जिल्हे सहभागी होणार

Next Post

‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित ; निधीतून सुशोभीकरणाचंही काम पूर्ण, सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'प्रिसिजन'च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित ; निधीतून सुशोभीकरणाचंही काम पूर्ण, सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996555
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group