Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित ; निधीतून सुशोभीकरणाचंही काम पूर्ण, सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : प्रिसिजन समूहाच्या पुढाकारातून मोदी स्मशानभूमीतील बंद असणारी पहिली विद्युतदाहिनी बुधवारी (दि. १९) कार्यान्वित झाली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा यांनी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे आज याबाबतचं हस्तांतरण पत्र सुपूर्द केलं. 

कोरोना महामारीमुळे सोलापूरात मृतांची संख्या वाढत असून फूटाफूटाच्या अंतरावर चिता रचाव्या लागत आहेत. इतकंच नव्हे तर अनेक मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत आहेत.  ही वस्तुस्थिती सोलापूरातील माध्यमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली होती. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीतील पहिली विद्युतदाहिनी तत्काळ सुरू व्हावी असं आवाहन उपायुक्त पांडे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केलं होतं. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पुढाकार घेत प्रिसिजन समूहाने आपल्या सीएसआर निधीतून ही विद्युतदाहिनी कार्यान्वित केली आहे.

विद्युतदाहिनीमध्ये नव्या कॉईल्स व नवा ब्लोअर बसविण्यात आला आहे. ट्रॉन्सफॉर्मरचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. श्रद्धांजली सभागृहासह संपूर्ण स्मशानभूमीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नवे लाईट्स बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारासमोरील पटांगणात चाफ्याची झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलं आहे. अस्थी गोळा करण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या असून आवश्यक ते माहितीफलकही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रिसिजनच्या टीमने अत्यंत वेगाने काम करत अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत हे नूतनीकरण पूर्ण केलं. यासाठी यतिन शहा यांनी स्वतः वारंवार मोदी स्मशानभूमीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता.

या योगदानाबद्दल उपायुक्त पांडे यांनी प्रिसिजन समूहाचे आभार मानले. नूतनीकृत मोदी स्मशानभूमीचं पावित्र्य जपण्यासाठी सोलापूरकरांनीही महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.

या हस्तांतरणावेळी प्रिसिजनचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप महिंद्रकर व सिद्धेश्वर चंदनशिवे, केतन व्होरा,जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे व आदित्य गाडगीळ, मोहसीन अत्तार, अस्लम कलादगी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे झोनल ऑफिसर विजयकुमार लोखंडे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी व परवेज शेख, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांच्यासह आरोग्य विभागाचे पूनम कांबळे, श्रीशैल हिंगमिरे, राजू डोलारे हे उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

करण म्हेत्रे यांना एक न्याय व राजीव सातव यांना दुसरा न्याय असे का? सोलापूरात या नेत्याने घेतला आक्षेप

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : ही केली मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र : ही केली मागणी

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996555
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group