सोलापूर / प्रतिनिधी
कोरोनामुक्त सोलापूर जिल्ह्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्व जिल्हावासियांनी टोचून घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिविल हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस टोचून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. मोहन शेगर, डॉ. विठ्ठल धडके आदी उपस्थित होते.
—-

















