सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भुसार आडत व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद अखेर स्थगित करण्यात आला
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार आडत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून बंद पुकारला होता तातडीने बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे व व्यापाऱ्यांची बैठक घेतली यावेळी उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यापाऱ्यांची म्हणणे ऐकून घेतले,यानंतर सभापती विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पोलीस प्रशासन, महापालिका आणि व्यापारी संघटनांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिल्या नंतर भुसार अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांनी बंद स्थगित असल्याची घोषणा केली. सोमवारी २४/५/२०२१ रोजी दुकाने महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरु राहतील. असंही भुसार आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांनी सांगितलं..