सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सुरेश हसापुरे यांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, हसापुरे म्हंटलं की, समोर येईल ते त्यांचं मास्टर माईंड डोकं. सोलापूरच्या राजकीय कारकिर्दीत हसापुरे यांनी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पद, बाजार समितीचे उपसभापती पद, जिल्हा परिषदेचे सदस्य पद, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदे भोगली आहेत, तसेच सध्या त्यांच्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्षपद आहे.
दक्षिण तालुक्यातून डिसीसी बँकेवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे, ज्यांना आयुष्यात जी पदे मिळण्याची अपेक्षा नव्हती त्यांना ती पदे हसापुरे यांनी मिळवून दिली आहेत, याची सुरुवात जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीपासून झाली, प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेत पाठवण्यात हसापुरे यांचाही तितकाच वाटा होता, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला मात्र पराभव पचवत त्यांनी आपले मित्र संजय मामा शिंदे यांना अध्यक्ष होण्यासाठी सर्व नियोजन आणि बांधणी केली होती, तो प्रयोग यशस्वी झाला आणि संजयमामा हे झेडपीचे अध्यक्ष झाले . मोहोळचे विजयराज डोंगरे यांना जिल्हा परिषदेचे सभापती पद सलग पाच वर्षे मिळाले, त्यात ही हसापुरे यांचा सिंहाचा वाटा आहे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती मात्र हसापुरे यांनी जुळवणी केली अन् म्हेत्रे संचालक झाले,
बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात उभारण्यासाठी नेते धास्तावत होते, मात्र सर्व नेत्यांना एकत्र केले मोट बांधली ती हसापुरे यांनी. मात्र ज्याने हे जुळवून आणले त्याच हसापुरे यांचा पराभव केला गेला हे त्या निवडणुकीचे दुर्दैव होते, तोसुद्धा पराभव पचवून हसापुरे यांनी दिलीप माने यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका उचलली त्यानंतर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा आणि बाजार समितीचा दूरवर संबंध नव्हता ते संचालक तर दूरच बाजार समितीचा सभापती होण्याचा सुद्धा त्यांनी कधी विचार केला नसेल पण तो सुद्धा योग सुरेश हसापुरे यांच्यामुळेच जुळून आला आणि आजपर्यंत विजयकुमार देशमुख बाजार समितीचे सभापती आहेत.
हसापुरे यांचे संबंध सर्वच राजकीय पक्षांसोबत आहेत त्यांचे संबंध थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्यासोबत आहेत, हसापुरे यांचे जिल्ह्यात मोहिते-पाटील घराण्याची जुळते, परिचारक घराण्याची चांगले संबंध आहेत, माढयाच्या शिंदे घराण्याचे तर ते जवळचे मित्र आहेत, मंगळवेढ्याचे नूतन आमदार समाधान आवताडे हे तर त्यांचे अत्यंत चांगले मित्र आहेत.
काँग्रेस पक्षाचे ते सध्या जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यामुळे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही मर्जीतले हसापुरे आहेत. मागील काही वर्षापासून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोबतची त्यांची मैत्री अतिशय घनिष्ट अशी आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी सोलापूर झेडपीच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यास सभागृह आणि प्रशासनाला भाग पाडले होते, जिल्ह्यात सर्वांना जुळवून घेणारा हा नेता आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांसोबत जुळवून घेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, जिल्हाध्यक्ष पदासाठी हसापुरे यांच्या नावाची चर्चा होते भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हसापुरे यांचे नेतृत्व जर काँग्रेसला मिळालं तर निश्चितच याचा पक्षाला फायदा होणार असल्याचे बोलले जाते कोणाला कुठे बसवायचं, कुणाशी कसे जुळवून घ्यायचं, आणि पक्षाचा फायदा कसा करून घ्यायचा यामध्ये हसापुरे हे ‘माहिर’आहेत .त्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्षाने जिल्ह्याचे नेतृत्व बदलण्यासाठी पावलं उचलावी अशी चर्चा खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधूनच होत आहे.
























