Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हार कर जितने वाले को ‘सुरेश हसापुरे’ कहते है….! वाढदिवस स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचं राजकारण सुरेश हसापुरे यांच्या नावा शिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, हसापुरे म्हंटलं की, समोर येईल ते त्यांचं मास्टर माईंड डोकं. सोलापूरच्या राजकीय कारकिर्दीत हसापुरे यांनी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पद, बाजार समितीचे उपसभापती पद, जिल्हा परिषदेचे सदस्य पद, राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदे भोगली आहेत, तसेच सध्या त्यांच्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्षपद आहे. 

दक्षिण तालुक्यातून डिसीसी बँकेवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे, ज्यांना आयुष्यात जी पदे मिळण्याची अपेक्षा नव्हती त्यांना ती पदे हसापुरे यांनी मिळवून दिली आहेत, याची सुरुवात जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीपासून झाली, प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेत पाठवण्यात हसापुरे यांचाही तितकाच वाटा होता, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला मात्र पराभव पचवत  त्यांनी आपले मित्र संजय मामा शिंदे यांना अध्यक्ष होण्यासाठी सर्व नियोजन आणि बांधणी केली होती, तो प्रयोग यशस्वी झाला आणि संजयमामा हे झेडपीचे अध्यक्ष झाले . मोहोळचे विजयराज डोंगरे यांना जिल्हा परिषदेचे सभापती पद सलग पाच वर्षे मिळाले, त्यात ही हसापुरे यांचा सिंहाचा वाटा आहे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती मात्र हसापुरे यांनी जुळवणी केली अन् म्हेत्रे संचालक झाले, 

बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात उभारण्यासाठी नेते धास्तावत होते, मात्र सर्व नेत्यांना एकत्र केले मोट बांधली ती हसापुरे यांनी. मात्र ज्याने हे जुळवून आणले त्याच हसापुरे यांचा पराभव केला गेला हे त्या निवडणुकीचे दुर्दैव होते, तोसुद्धा पराभव पचवून हसापुरे यांनी दिलीप माने यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका उचलली त्यानंतर भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा आणि बाजार समितीचा दूरवर संबंध नव्हता ते  संचालक तर दूरच बाजार समितीचा सभापती होण्याचा सुद्धा त्यांनी कधी विचार केला नसेल पण तो सुद्धा योग सुरेश हसापुरे यांच्यामुळेच जुळून आला आणि आजपर्यंत विजयकुमार देशमुख बाजार समितीचे सभापती आहेत.

हसापुरे यांचे संबंध सर्वच राजकीय पक्षांसोबत आहेत त्यांचे संबंध थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत, उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्यासोबत आहेत, हसापुरे यांचे जिल्ह्यात मोहिते-पाटील घराण्याची जुळते, परिचारक घराण्याची चांगले संबंध आहेत, माढयाच्या शिंदे घराण्याचे तर ते  जवळचे मित्र आहेत, मंगळवेढ्याचे नूतन आमदार समाधान आवताडे हे तर त्यांचे अत्यंत चांगले मित्र आहेत.

काँग्रेस पक्षाचे ते सध्या जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आहेत त्यामुळे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही मर्जीतले हसापुरे आहेत. मागील काही वर्षापासून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोबतची त्यांची मैत्री अतिशय घनिष्ट अशी आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी सोलापूर झेडपीच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यास सभागृह आणि प्रशासनाला भाग पाडले होते,  जिल्ह्यात सर्वांना जुळवून घेणारा हा नेता आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला आक्रमक आणि सर्वांसोबत जुळवून घेणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, जिल्हाध्यक्ष पदासाठी हसापुरे यांच्या नावाची चर्चा होते भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हसापुरे यांचे नेतृत्व जर काँग्रेसला मिळालं तर निश्चितच याचा पक्षाला फायदा होणार असल्याचे बोलले जाते कोणाला कुठे बसवायचं, कुणाशी कसे जुळवून घ्यायचं, आणि पक्षाचा फायदा कसा करून घ्यायचा यामध्ये हसापुरे हे ‘माहिर’आहेत .त्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्षाने जिल्ह्याचे नेतृत्व बदलण्यासाठी पावलं उचलावी अशी चर्चा खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनी मधूनच होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

झिरो बजेट ऍक्शन सीन पहा, हा व्हिडीओ होतोय फेसबुकवर प्रचंड व्हायरल

Next Post

ब्रेकिंग ! आता राष्ट्रवादीच्या या मंत्र्याची बारी ; किरीट सोमय्यांनी घेतले यांचे नाव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! आता राष्ट्रवादीच्या या मंत्र्याची बारी ; किरीट सोमय्यांनी घेतले यांचे नाव

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002439
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group