सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात नवीन सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी भारतीय जनता पार्टीचे आनंद गोसकी यांना सांगितले.
सोलापूर शहर आणि जिल्ह्याबरोबरच राज्याच्या सीमावर्ती ईतर भागातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा आधार अशी ओळख असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटी स्कॅनची मशीन गेल्या सहा ते सात महिन्यापासून बंद असल्याने दररोज रुग्णालयात हेळसांड होण्याबरोबरच त्यांना इतरत्र त्या सुविधेची तपासणी करायची म्हटले तर फार मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरील असतो, ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते आनंद गोसकी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन, निवेदन देऊन सिटीस्कॅन मशीनची निकड त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रूग्णालय सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये या सुविधेअभावी सर्वसामान्य, कष्टकरी, गोरगरीब रूग्णांना उपचार घेत असतांना शारीरीक, मानसिक व आर्थिक परिस्थीतीचा खूप मोठा फटका सहन करावा लागत आहे. रूग्णांवर उपचार सुरू असतांना पेशंटला जीव मुठीत धरून बाहेर जाऊन सिटीस्कॅन करावे लागत आहे. ही समस्या अत्यंत गंभीर असल्याने आनंद गोसकी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या ‘सेवासदन’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदनाद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सिव्हील हॉस्पिटलमधील बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन दुरूस्ती किंवा नविन उपलब्ध करून देण्याचा आग्रह रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्याकडे केला होता. रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन, मंञी गिरीष महाजन त्यांनी तात्काळ फोन करून संबंधितांना सूचना केली.
सोलापुरातील शासकीय रूग्णालयात येत्या महिनाभरात नविन सिटीस्कॅन मशिन व एम. आर. आय. मशिन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी भाजपा कार्यकर्ते, रूग्णसेवक आनंद गोसकी यांना दिली.
या आगोदरही गोसकी यांनी वैद्यकीय शिक्षणमंञी गिरीष महाजन यांच्या सोबत दुरध्वनीवर ध्वारे सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने गोरगरीबांना होणार्या ञासाबद्दल कल्पना महाजन यांना आनंद गोसकी यांनी दिली होती. परंतु आज महाजन यांनी एक महिन्यात नविन मशिन येईल असे गोसकी यांना सांगितले यावेळी त्यांच्यासमवेत विकास वाघमारे उपस्थित होते.

















