Monday, November 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहारांची सोलापुरात चौकशी ; तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी केली चौकशी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 July 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन  शिक्षणाधिकारी किरण लोहार हे शनिवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल चौकीत उपस्थिती लावून गेले. जवळपास दोन तास पोलिसांनी चौकशी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने किरण लोहार यांनी माझी फसवणूक केली आहे. विविध अमिशे दाखवून लाखो रुपये उकळले असा आरोप जाकेरा फिरदोस शाहिद खान यांनी केला होता. 


घरकुल चौकीचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी अधिक खोलात जाऊन तपास करत,तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार,सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले शिपाई संजय सातपुते, राकेश गायकवाड तसेच विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना घरकुल पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलावून घेतले होते. संबंधित महिलेच्या समोर सर्व बाबींचा तपास पोलिसांनी केला आहे.


सोलापूरमधील एका खाजगी शाळेला वर्गवाढीची मान्यता देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाचेची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली होती.तडजोडी नंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ३१ ऑक्टोबर 2022 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर युनिटने सापळा कारवाई करत ,प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रंगेहाथ पकडले होते. याबाबत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जाकिरा फिरदोस खान, शाहिद उल्लू खान या दोघांना बोगस शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडण्यात आले होते. बोगस शिक्षणाधिकारी सापडल्यानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी २२ डिसेंबर २०२२ रोजी वळसंग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला आहे. याच महिलेने  २८ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला होता. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मला शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले. शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा असे सांगत पैसे घेण्यास सांगितले.



वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरकुल पोलीस चौकीत शनिवारी सायंकाळी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी उपस्थिती लावली होती. जाकेरा खान ही संशयित महिला देखील पोलीस चौकीत हजर होती. पोलिसांनी समोरासमोर विचारपूस करण्यास सुरुवात केली. ही विचारपूस जवळपास दोन तास सुरू होती.यामध्ये संबंधित महिलेने किरण लोहार यांवर गंभीर आरोप केले. महिलेचे जबाब नोंदवून व किरण लोहार यांचा जबाब नोंदवून पोलीस प्रशासन चार्जशीट कोर्टात दाखल करणार आहेत. 


शुक्रवारी दुपारी विद्यमान शिक्षणाधिकारी संजय जावीर यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी शिक्षण खात्यातील दोन शिपाई संजय सातपुते व राकेश गायकवाड हे देखील चौकीत उपस्थित होते. या दोन्ही शिपाई सोबत संबंधित महिलेचे मोबाईल कॉल रिकॉर्डिंग देखील आहेत. ते रिकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे,लवकरच या सर्व बाबींचा तपास होणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार संजयमामांच्या रूपात सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री द्या ; होऊ लागली जोरदार मागणी

Next Post

“नरेंद्र मोदी तुम्ही नट्टापट्टा कमी करा, तुमची किळस येऊ लागली आहे” ; आमदार प्रणिती शिंदेंची सोलापुरी टीका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"नरेंद्र मोदी तुम्ही नट्टापट्टा कमी करा, तुमची किळस येऊ लागली आहे" ; आमदार प्रणिती शिंदेंची सोलापुरी टीका

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2004012
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group