Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात पुन्हा “मेरे अंगने में” ; ताई-मामात रंगला श्रेयवाद…! मालकांचीही व्यापाऱ्यांच्या बाजूने उडी, कोण कुणाचे ऐकणार उत्सुकता शिगेला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 June 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान एक वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले होते, ते म्हणजे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं. आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने, महेश कोठे यांना लक्ष केले होते, स्वतःचे मतदार संघ सोडून माझ्या मतदारसंघात काय काम असा त्याचा अर्थ होता, 

नंतर सिद्धेश्वर यात्रेचा विषय आला, ती कशा पद्धतीने करायची यावर शासन दरबारी गोंधळ झाला, निर्णय घेता येईना, तेव्हा आमदार संजयमामा शिंदे यांनी शहराच्या यात्रेसाठी आमदार विजय देशमुख यांच्या सोबत प्रयत्न  केले, त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सुध्दा शासन स्तरावर खूप प्रयत्न केले, देवस्थान पंच कमिटी शिष्टमंडळ मुंबईला नेले. तेव्हा दोन शिंदे आमदारात चांगलाच श्रेयवाद रंगला होता, त्यावेळी ही मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं हे वाक्य चर्चेला आले,  

सध्या कोरोना संसर्ग कमी न झाल्याने सोलापूर शहरात 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झालाय, पुन्हा 15 दिवस वाढल्याने व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे, निवेदने झाली, आंदोलने झाली, व्यापाऱ्यांना अटक पण झाली, पण निर्बन्ध शिथील करण्याचा निर्णय होत नाही, सोलापूर शहराचा विषय असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार ताईंनी केली आहे, दुसरीकडे आमदार संजयमामा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार  यांनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लॉक डाऊन शिथील करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, आता शहरात पुन्हा या दोन शिंदे आमदारांच्या श्रेयवादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, पुन्हा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं या वाक्याची चर्चा होत आहे. मामा करमाळ्याचे आमदार असताना त्यांचं शहरात काय काम असा प्रश्न निश्चितच काँग्रेसचे शहराचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. 

यात कोण बाजी करतय याकडे लक्ष असून यात दिलीप माने मालकांनी उडी घेतलीय, ते व्यापाऱ्यांचे नेतृत्व करत आहेत, ते शिवसेनेचे नेते आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कोडे पडले आहे, सध्या त्यांना शिवसेनेचे नेते म्हणूनच ओळखले जाते, मग माने मालकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून हा विषय मिटवावा पण ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावतात, यावरून त्यांच्या राजकारणाचा कुणाला अंदाज येत नाही. निर्णय झाल्यास मात्र माझ्यामुळे झाला म्हणून कुणी श्रेय घेऊ नये, प्रयत्न सर्वांचेच आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

करण म्हेत्रे अंत्ययात्रा प्रकरणी काँग्रेसने पोलीस आयुक्तांकडे केली ही मागणी

Next Post

दोन महिन्यात 61 लाखाचा गुटखा, 23 लाखाची वाहने जप्त ; अन्न व औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कामगिरी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दोन महिन्यात 61 लाखाचा गुटखा, 23 लाखाची वाहने जप्त ; अन्न व औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कामगिरी

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002432
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group