“ एप्रिल 2021 ते मे-2021 मध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलिस विभाग यांच्या संयुक्त धडक कारवाईमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखु या अन्न पदार्थाचा सुमारे 61 लाख, 30 हजार रुपयाचा साठा नष्ट ”
दिनांक 15/04/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशांत कुचेकर यांना प्रतिबंधित अन्न पदार्थाचे पुणे येथे वाहतुक होत असल्याबाबतची प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगे सुरेश ओसवाल यांच्या मालकीचे प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण 873990/- चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
दिनांक 06/05/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, मंगेश लवटे व सांगोला पोलिस स्टेशन, सांगोला यांच्या संयुक्त कारवाई मध्ये आयशर क्र. एम. एच. 14 जी डी 5244 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा सुमारे 14,64,420/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता.
दिनांक 25/05/2021 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी, मंगेश लवटे व सांगोला पोलिस स्टेशन, सांगोला यांच्या संयुक्त कारवाई मध्ये टाटा 2515 सी वाहन क्रमांक एम.एच. 21 एक्स. 1947 या वाहनातुन प्रतिबंधित अन्न पदार्थाचा सुमारे 31,95,000/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता.
एप्रिल 2021 ते मे 2021 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात 08 ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण एकत्रित किंमत रुपये 61,30,341/- चा साठा जप्त करण्यात आलेला होता. तसेच प्रतिबंधित् अन्न पदार्थाचे वाहतुक केल्याप्रकरणी 07 वाहने जप्त करण्यात आलेले आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत 2339000/- इतकी आहे. तसेच जप्त वाहनाचे परवाने रद्द करण्यासाठी आर.टी.ओ (परिवहन विभाग) कार्यालयास कळविण्यात आलेले आहे.
उपरोक्त सर्व प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई घेऊन संबंधित इसमांविरुध्द भा.दं.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांचे कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.
ही कारवाई परिमल सिंग, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे , शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व सर्व अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, नसरिन मुजावर, प्रज्ञा सुरसे, योगेश देशमुख, मंगेश लवटे, उमेश भुसे व प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने पुर्ण केली.




















