सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सोलापूर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयातील अजित पवारांच्या प्रतिमेवर फूल्या मारणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर शहरातील कार्यकर्त्या शशिकला कसपटे व मोनिका पवार या रविवारी अजितदादा गटात दिसून आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पूर्व विभाग वाचनालय येथे संपन्न झाली. त्या बैठकीला या दोन्ही महीला कार्यकर्त्या दिसून आल्या. कसपटे यांनी बोलताना महीला अध्यक्षा सुनिता रोटे यांच्या कारभारावर टीका केली, प्रदेश महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कारभाराचे मात्र तोंडभरून कौतुक केले… पहा त्या काय म्हणाल्या….



















