Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या विकासासाठी अजित पवार यांच्या आम्ही पाठीशी ; सोलापूरचे नेतृत्व संतोष पवार यांनी करावे ; बैठकीत ठराव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची सोलापूर शहरातील पहिलीच बैठक रविवारी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले. अजितदादा यांच्यात विकासाची धमक असून सोलापूर शहराचा विकास पाहता आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचा सूर बैठकीमध्ये पुढे आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव संतोष पवार होते. माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, वसीम बुऱ्हान, श्रीनिवास कोंडी, राम साठे, प्रमोद भोसले, अमीर शेख, हेमंत चौधरी, खलील शेख, मल्लेश बडगु, बसवराज कोळी, राजाभाऊ  बेळेनवरू, रुपेश कुमार भोसले, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, सिद्धेश्वर आंबट, शशिकला कस्पटे, मोनिका पोवार, लता ढेरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात असताना सोलापुरात अनेक मोर्चे, आंदोलने, निषेध, निदर्शने इथे जमलेल्याच पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. युवक, महिला, अल्पसंख्यांक, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त यासह सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष जिवंत ठेवला. अनेक गुन्हे अंगावर घेतले त्यामुळे स्वार्थासाठी आपण अजित दादा सोबत गेलो हा आरोप चुकीचा असून स्वार्थ आमच्या रक्तात नाही असे खोडून काढतानाच राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, यांच्यासह सर्व नवमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव संतोष पवार यांनी मांडला. यावेळी सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हात वर करून या ठरावाला एकमताने मंजुरी दिली.

जुबेर बागवान म्हणाले, पक्षाचे विधानसभा अध्यक्ष, पक्षाचा युवक अध्यक्ष, पक्षाच्या महिला पदाधिकारी, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक नेते, अल्पसंख्यांक पदाधिकारी, ओबीसी पदाधिकारी येथेच आहेत मग संघटना कुठे आहे? पक्ष कुठे आहे? तर या स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व पक्ष, संघटना आहे. सर्वांना माहित आहे 2017 ते 2022 सालापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, संघटना उभी कोणी केली? मजबूत कोणी केली? तर ते एकमेव नाव म्हणजे संतोष पवार. सोलापूर शहराचे नेतृत्व करणारा तरुण तडफदार म्हणून संतोष पवार हे एकमेव कार्यकर्ते आहेत आणि सोलापूर शहर अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड व्हावी असा ठराव जुबेर बागवान यांनी मांडला.

सोलापूर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न निधी शिवाय सुटू शकत नाहीत त्यासाठी अजित पवार यांची सोलापूर शहराच्या विकासासाठी निश्चितच मदत होणार आहे. म्हणूनच सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही अजित पवार यांच्या सोबत आहोत, ना की स्वार्थ पाहून असेही बागवान यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारणाऱ्या शशिकला कसपटे व मोनिका पवार दादा गटात ; कुणावर केली टिका…Video

Next Post

मोहोळ तालुक्यातील रस्ते खराब ; सोलापूर झेडपी समोर भीम टायगर सेनेने घातला जागरण गोंधळ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोहोळ तालुक्यातील रस्ते खराब ; सोलापूर झेडपी समोर भीम टायगर सेनेने घातला जागरण गोंधळ

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996693
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group