सोलापूर : गुलामहुसेन कोंडाजी शेख (वय : 86 राहणार मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर ) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी 27जून 2021 दहा वाजता मंद्रूप येथेल कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्री यांचे ही निधन झाले होते, त्यानंतर वडील गेले शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, मंद्रुप गावात गुलाम हुसेन शेख हे नामांकित व्यक्तिमत्त्व होतं, त्यांना पेपर वाचनाची प्रचंड आवड होती, सकाळी सहा वाजता ते मंद्रुप एसटी स्टँडवर असायचे सर्व पेपर वाचन करूनच पुढील सुरु व्हायचा अशा अनेक आठवणी लोक सांगतात. सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे माध्यम अधिकारी रफिक शेख यांच्या त्या वडील होत.


















