सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दर सोमवारी भारतीय जनता पार्टीचा आमदार येऊन आपल्या आपल्या सदस्यांची कामे करून घेण्याचे नियोजन ठरले होते त्याप्रमाणे काही सोमवारी आमदार आले काही सोमवारी आले नाहीत. या सोमवारी मात्र जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये कुंभारीच्या कार्यकर्त्यांसह झेडपी पक्षनेता अण्णाराव बाराचारे यांची गर्दी दिसून आली, असे वाटत होते कि आमदार सचिन कल्याणशेट्टी येथील मात्र झालं वेगळंच एका गाडी मधून तीन महाराज खाली उतरले आणि ते थेट पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांच्या केबिनमध्ये गेले,
त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचीही उपस्थिती होती. पक्षनेते च्या केबिन मध्ये कुंभारी च्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती त्या ठिकाणी महाराजांचा जंगी सत्कार करण्यात आला यानंतर महाराजांचे आशीर्वाद घेण्यात आले.
कुंभारी गावांमध्ये श्री स्वामीनारायण गुरुकुल सुरू करण्यात आले आहे हे गुरुकुल उभारण्यात कुंभारी चे सुपुत्र तथा पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे याच गुरुकुलचे प्रमुख कृष्णचरणदास स्वामी हे कुंभारीला आले होते, तेव्हा त्यांची भेट अण्णाराव बाराचारे यांनी भेट घेतली होती तेव्हा कृष्णचरण स्वामी यांना बाराचारे हे झेडपी पक्षनेता झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा स्वामींनी कार्यालयाला भेट देण्याचे ठरवले त्यामुळे ते सोमवारी दुपारी आपले सहकारी शिष्य शिवमंगल स्वामी व तीर्थस्वरूप स्वामी यांच्या सोबत येऊन भेट दिली.
एवढ्या मोठ्या गुरुकुलच्या महाराजांचे चरण आपल्या कार्यालयाला लागल्याने बाराचारे यांनी आपण धन्य झाल्याचं सांगितले. ज्या भारतीय जनता पक्षाच्या डॉ जयसिद्धेश्वर महाराजांना सोलापूरकरांनी निवडून दिले, बाराचारे यांनी मोठं मताधिक्य आपल्या जिल्हा परिषद गटातून दिले, आपल्या कार्यालयात मोठा फोटो लावला ते महाराज मात्र अजूनही सोलापूर जिल्हा परिषदेत आले नाहीत, बाराचारेंच्या कार्यालयाला भेट दिली नाहीत हे विशेष आहे.


















