मी पि शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत काढणेत आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे शुध्दीपत्रक निर्गमित करीत आहे.
संदर्भाय आदेश व या शुध्दीपत्रकानुसार सर्व संबंधत दुकानदार / व्यावसायिक / उद्योजक यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी केलेल्या छापील ICMR क्रमांक असलेला वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचा व १५ दिवसातून एकदा केलेला RAT / RT-PCR निगेटिक रिपोर्ट व अॅन्टी बॉडी टेस्ट प्रमाणपत्र (२ महिन्याच्या कालावधीतील) तसेच लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
उपरोक्त तरतुदीचा भंग केल्यास या कार्यालयाकडून यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडात्मक कारवाईचे अधिकार सोलापूर महानगरपालिकेच्या वसूलो लिपीक, आरोग्य निरीक्षक, विभागीय अधिकारी, सहा आयुक्त तसेच पोलिस नाईक व या दर्जाच्या वरील पोलिस अधिकारी यांना राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी.


















