राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे यांचे सध्या नवी वेस पोलीस चौकीच्या समोर “मनोहर-लक्ष्मी” या नावाने मॉलचे काम जोरात सुरू आहे. सपाटे साहेब सध्या नगरसेवक नसल्याने त्यांनी आपला पूर्ण फोकस याच कामाकडे ठेवला आहे.
भर रस्त्याच्या कडेलाच याचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळई, वाळू, विटा, क्रश सॅन्ड हे साहित्य सर्व रस्त्याच्या कडेला येऊन पडत , आणि हळूहळू हे साहित्य बरेच वर्दळ असलेल्या रस्त्यावर आले होते, त्यामुळे वाहनांना ये जा करताना अडचण निर्माण व्हायची.बरेच दिवस याकडे कुणी पाहिले नाही विशेष म्हणजे समोर पोलीस चौकी असताना.
रविवारी सोलापूरात मराठा आक्रोश मोर्चा होता, मोर्चा मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, नवी वेस पोलीस चौकीच्या चौकात पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची ड्युटी होती, बहुतेक बांधकाम साहित्य रस्त्यावर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी लगेच जेसीबी मागवला आणि रस्त्यावर आलेले खडी, क्रश सॅन्ड, लोखंडी सळई आत मध्ये ढकलले,
बांधकामाच्या बाजूने मारण्यात आलेला पत्राही पोलिसांनी जेसीबी कडून आत दाबला, त्यामुळे रस्ता बराच मोकळा झाला आहे, मनोहरपंत हे पहात होते मात्र, पोलीस असल्याने त्यांना काय बोलता आले नाही. त्यावेळी बरेच पत्रकार यांनी हे सर्व पाहिले आणि एकाने सपाटेंचे पोलिसांनी केले सपाटीकरण असे मजेदार वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.




















