Saturday, August 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : फसवणूक प्रकरणी माजी पोलिस उपअधीक्षकासह डॉक्टर मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-सात रस्ता परिसरातील कारीगर बंगला हि जागा संगनमताने खरेदीखत व लिव्ह अँड लायसेन्सी करून भाडेतत्त्वावर देऊन व बनावट दस्त करून  फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच  फिर्यादीस जागेमध्ये येण्यास शिवीगाळ दमदाटी प्रकरणी माजी पोलीस उप अधिक्षक महिबुब अ.करीम मुजावर व डॉ. असलम महिबुब मुजावर दोघे रा.सोलापूर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. शिरभाते यांनी मंजूर केला.

यात हकिकत अशी की,सन 2010 साली सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरामध्ये सिटी सर्व्हे नंबर म्यु. पल घर नं. 1./सी. व टी.पी.नं.3 तसेच सी. टी. सर्व्हे नं. 1641 असे एकूण क्षेत्र 2081.5 चौ. मी इतके क्षेत्र हे नजीर महमद हनिफ कारीगर यांचे नावावर होते त्यापैकी 1040.75 इतके क्षेत्र 1) खलील हजिभोलुमिया सालार 2) कु. बिलकीस महीबुब मुजावर 3)

अ. रशिद म.हनिफ शेख असे वरील तिघांना हिबाबिल एवज पध्दतीने मिळाली.वरील तिघांचे नावावर सदरची मिळकत होती. त्याबाबत डिड ऑफ सेटलमेंट अँड अंडरस्टँडींग करार झाला त्यापैकी अ. रशिद म. हनिफ शेख यांचे नावावर कराराप्रमाणे 20% प्रमाणे 208.15 चौ. मीटर जागा वाटयाला आली होती.

  अ. रशिद म. हनिफ शेख याने त्याच्या वाटयाला आलेल्या एकुण 208.15 चौ. मीटर जागेमधून 149.17 चौ.मी. जागा फिर्यादी, सौ. रंजीता संकलेश चाकोते व सौ. डॉ. किरण सुदीप चाकोते असे रक्कम रू.5,50,000/- रुपयास विक्री केली होती. त्या नंतर 58.98 चौ.मी. जागा हि महिबुब अ. करिम मुजावर यांना दस्ताने विक्री केली असल्यामुळे अ. रशिद शेख यांच्या वाट्याला आलेली एकुण 208.15 चौ. मीटर जागा ही संपूर्ण संपलेली होती.

  महिबुब अब्दुल करीम मुजावर यांना वरील झालेल्या व्यवहाराबाबत कोणाच्या वाटयाला किती जागा आलेली आहे याबाबत पुर्ण कल्पना होती कारण की, कु. बिलकीस महिबुब मुजावर ही महिबुब अब्दुल करीम मुजावर यांची नात्याने मुलगी आहे व  महिबुब मुजावर यांनी देखील स्वतः जागा खरेदी केलेली होती हे सर्व माहित असतांना देखील महिबुब अब्दुल करीम मुजावर यांनी अ. रशिद म. हनिफ शेख यांचेशी संगणमत करुन  138.76 चौ.मी. चे क्षेत्र हे डॉ. असलम महिबुब मुजावर यांना दस्ताने विक्री केली आहे. त्यानंतर अब्दुल रशिद म. हनीफ शेख व महिबुब मुजावर यांनी संगणमत करून अब्दुल रशिद म. हनीफ शेख यांचे वाट्यास आलेली एकुण 208.15 चौ.मीटर संपुर्ण विक्री केली असल्यामुळे संपलेली आहे हे माहित असतांना देखील महिबुब मुजावर यांनी क्षेत्र 208.15 चौ.मी. इतके क्षेत्रा त्यामध्ये आर.सी.सी बांधकाम हे अब्दुल रशीद म. हनीफ शेख यांच्याकडून खरेदी करून स्वतःच्या नावावर करून घेतली.

  त्यानंतर अब्दुल रशिद शेख व महिबुब मुजावर यांचा मुलगा असलम महिबुब मुजावर यांनी संगणमत करून अब्दुल रशिद शेख व महिबुब मुजावर

यांना मॅक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल तर्फे समिन अमिनुद्दीन काझी यांना 1)अब्दुल रशिद म.हनीफ शेख याची मालकीची अविभक्त क्षेत्र 208.15 चौ.मी. व 2) असलम महिबुब मुजावर याचे मालकीची अविभक्त क्षेत्र 138.76 चौ.मी. जांगा हि 60 महिन्याचे लिव्ह अॅन्ड लायसेन्सी करारपत्र नुसार दिलेली आहे.

  वरील संपूर्ण जागेची विभागणी नसताना महीबुब अ. करीम मुजावर यांनी त्या जागेवर दुकाने गाळे काढून ते भाडयाने दिले आहेत. तसेच डॉ. असलम मुजावर यांनी 138,76 व [व] अ.रशीद शेख यांनी 208.15 जागा शिल्लक नसताना ती जागा समीन काझी यांचेशी आमचे परस्पर भाडे करार करून हॉस्पीटलला भाडयाने देवून आम्हाला सदर जागेवर येण्यास प्रतिबंध करून शिवीगाळी दमदाटी करीत आहेत. अशा अशयाची फिर्याद  पुष्पा चाकोते यांनी सदर बझार पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.

 यात आरोपींना अटक होईल ह्या भितीपोटी आरोपींनी अँड. संतोष न्हावकर यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यात आरोपी तर्फे युक्तिवाद करताना अँड.संतोष न्हावकर यांनी जास्त जागेचे खरेदीखत केल्याने फिर्यादीची कोणतीही फसवणूक झालेली नसून सदरचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद मान्य करून न्यायमूर्तींनी आरोपींना अटकपूर्व जामिनावर मुक्त करणेचे आदेश दिले.

यात आरोपीतर्फे अँड संतोष न्हावकर, अँड वैष्णवी न्हावकर ,अँड राहुल रुपनर,अँड शैलेश पोटफोडे यांनी  तर सरकार पक्षातर्फे अँड. दतूसिंग पवार यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या परिवहन कामगारांसाठी खुशखबर ; सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले हे आदेश

Next Post

पंढरपुरात पैसे उसने देण्यावरून केला खून ; पोलीसांनी आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पंढरपुरात पैसे उसने देण्यावरून केला खून ; पोलीसांनी आवळल्या मारेकऱ्यांच्या मुसक्या

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1997542
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group