केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले, नंतर काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्ष काढलेले परत भाजप मध्ये गेलेले सडेतोड नेते, उद्धव ठाकरे विरोधक नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली, हे मंत्रीपद देण्यामागे भाजपचा प्लॅन असला तरी राणे यांनीच बुधवारी मार्केट मारले, संपूर्ण महाराष्ट्रात राणे यांचीच चर्चा होती, राज्यातील राणे समर्थकांनी पाच महिने अगोदरच दिवाळी साजरी केली. सोलापूर जिल्ह्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, संतोष पाटील, सुनील खटके अशा अनेक नेत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राणे यांचा भाजपवर टीका करणारा व्हिडीओ व्हायरल केला आहे पहा तो व्हिडीओ….👇👇👇👇



















