Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

NCP प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उडवली पंतप्रधानांची खिल्ली ; “मोदींच्या दाढी”प्रमाणे गॅस,पेट्रोल दर वाढू लागला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 July 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर !  देशासह राज्यात सध्या महागाई वाढत आहे, हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून राग व्यक्त करा, महिला संघटना मजबूत करा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महिलांचा प्रतिसाद व सहभाग वाढत आहे याचे कौतुक वाटते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महापौर राष्ट्रवादीचा करण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थितांना केले.

       राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सोमवार दि. 19 जुलै रोजी शहरातील सुभद्रा मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाकणकर बोलत होत्या.

     यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेविका सुनीता रोटे, राष्ट्रवादीच्या जिल्हा निरीक्षक दिपाली पांढरे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे, डॉ. दादाराव रोटे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

      चाकणकर म्हणाल्या, देशासह राज्यभरात महागाई वाढत आहे, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दाढी सारखे गॅसचे दर वाढत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे त्यामुळे संघटना म्हणून तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आंदोलनाच्या माध्यमातून महागाईविरोधात राग व्यक्त करा संघटनांमधून प्रश्न सोडवले पाहिजे म्हणून महिला मेळावा आयोजित केला आहे. कोणतेही प्रश्न असले तरी पहिले आंदोलन सोलापूरमध्ये होते याचे कौतुक वाटते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिलांना सन्मान आहे, महिलांचा प्रतिसाद ही वाढत आहे.

      आगामी महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादीतून निवडून आले पाहिजे त्यासाठी तयारी लागा, यंदाचा महापौर राष्ट्रवादीचा झाला पाहिजे यासाठी कामाला लागा, महापौर राष्ट्रवादीचा झाल्यास गुलाल उधळण्यासाठी मला आमंत्रित करावे अशी इच्छा चाकणकर यांनी व्यक्त केली. 

     उमेश पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिलांना सन्मान दिला जातो, सरकारी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के राखीव देणारा हा पक्ष आहे. दोन देशमुखच्या भांडणामुळे सोलापूरकर  कंटाळले आहेत. महिलांनी एकजुटीने काम केल्यास महापालिकेच्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल. कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले, पक्ष व संघटना वाढीसाठी मेळावा घेणे गरजेचे आहे, यामुळे राष्ट्रवादी घराघरात पोहोचेल. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादीला फायदा होईल असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव  यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सुनीता रोटे तर आभार लता ढेरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर महिला राष्ट्रवादी आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | हा तर मामा “लबाडच” ; जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

Next Post

दमदार अजितदादा पवार…,गीतावर नाचले संतोष… पवार…!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दमदार अजितदादा पवार...,गीतावर नाचले संतोष... पवार...!

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002331
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group