पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये झालेल्या डॉन्सपार्टीवर पोलिसांनी धाड टाकून महिलासोबत डान्स करणाऱ्या एका डॉक्टरासह ११ जणांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.
हॉटेल सानवी रिसाेर्टमध्ये हॉटेल मालक विनय कांबळे आणि त्यांचा मित्र डॉ. निखिल भाकरे राहणार भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आंबेगाव यांनी आपल्या हॉटेलमधील दोन रुममध्ये डान्स पार्टी ठेवली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली.
सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. तेव्हा तेथे एलईडी लाईट लावून, साऊंड सिस्टीमवर गाणी लावून अनेक जण बेधुंद होऊन नाच करताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमाचे भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर झाला अंधाराचा फायदा घेऊन फरार
हॉटेलमालक विनय सुभाष कांबळे वय ३२, राहणार आकाशनगर, वारजे, संदीप शंकर कोतवाल वय ४७, रा. हिंगणमळा, हडपसर, सचिन विठ्ठल शिंदे वय ३८, रा. आनंदनगर, सिंहगड रोड, कालीदास शशिराव काकडे वय ५०, रा.हडपसर, विठ्ठल विजय माेरे वय ४३, रा. हडपसर, राजेश बलभिम वाघमारे वय ४५, रा. हडपसर व इतर ४ महिला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. डॉ. निखिल भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.


















