Wednesday, August 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग !सोलापूर शहरात सोमवारपासून कोणतेही बदल नाहीत, महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 July 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर शहरात 26 जुलै सोमवार पासून व्यापाराच्या वेळेत बदल होईल अशी चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी सायंकाळी नवे आदेश काढले आहेत त्या आदेशांमध्ये काय आहे ते पाहूयात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे या ठिकाणी झालेल्या एका बैठकीत सोमवार पासून काही शहरातील निर्बंध शिथिल होतील अशी माहिती दिली होती त्यामुळे रविवारी दिवसभर सोलापूर शहरात सोमवारपासून दुकाने रात्री सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास महापालिकेकडून परवानगी मिळेल अशी चर्चा ऐकण्यास मिळाली तशा बातम्याही काही प्रसारमाध्यमांनी लावल्या होत्या त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होती, महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते मात्र सायंकाळी साडेचारच्या सुमारास महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सुधारित आदेश काढले. सोलापूर शहर हे डेल्टा प्लस व्हेरियन्ट या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातच असून कोणतेही निर्बंध शिथिल केले नाहीत असे आदेशात नमूद केले आहे. दिनांक 27 जुलै सोमवार सकाळी सात वाजल्यापासून पासून ते पुढील आदेश येईपर्यंत सोलापूर शहरात आहे तेच निर्बंध कायम राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे सोलापूर शहरातील व्यापार हा सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, इकडे सोलापूर शहरात कोरूनाची रुग्ण संख्या कमी असताना दुसरीकडे मात्र नियम शिथिल करण्याऐवजी महापालिका प्रशासन शहरवासीयांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे.

ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.

ज्याअर्थी संदर्भ क्र. १० च्या शासन मान्यतेने सोलापूर महानगरपालिका क्षेत्र हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळाल्याने तसेच मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र. २५ यास अनुसरुन कोविड-१९ चे विषाणू डेल्टा प्लस या व्हेरिएंट मध्ये करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात लेव्हल-३ चे निर्बंध लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.

त्याअर्थी, मी, पि शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी दिनांक २७/०६/२०२१ रोजीचे आदेश व दिनांक २८/०६/२०२१ रोजीच्या शुध्दीपत्रकातील आदेशच दि. २६/०७/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | बीडचा चोरटा, मोबाईल चोरले सोलापूरात ; पोलिसांनी बीडमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या ; ०४ मोबाईल जप्त

Next Post

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या डान्स पार्टीवर पोलिसांची धाड ! कोरोनात नियम तोडल्याने कारवाई

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या डान्स पार्टीवर पोलिसांची धाड ! कोरोनात नियम तोडल्याने कारवाई

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996546
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group