महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते, त्यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन सोलापूर शहर जिल्हा पदाधिकार्यांच्या निवडी केल्या यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्षपदी राजश्री गायकवाड यांची निवड झाली,कोषाध्यक्ष या पदावर दिपा लोंढे, रामजी गायकवाड यांची महासचिव या पदावर नियुक्ती झाली. यावेळी पत्रकारांनी त्यांना एससी या प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या जाती मध्ये गणले जाते महार, बौद्ध की नवबौद्ध यावर स्पष्टीकरण द्यावे असा प्रश्न केला असता त्यांनी मुळात महार हा शब्दच उच्चारू नये,आपली ओळख बौद्ध म्हणून करावी असे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली पहा ते काय म्हणाले.















