Tuesday, November 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मनिषा आव्हाळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या महिला सीईओ ; पहिल्या सीईओची राहिली केवळ चार महिने कारकीर्द ; आव्हाळे यांच्या समोर हे आव्हान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 July 2023
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली शनिवारी आवळे यांनी सकाळीच आपला पदभार स्वीकारला मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना पदभार देऊन खुर्चीवर बसवले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विराजमान होणाऱ्या मनिषा आव्हाळे या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत.


यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्वेता सिंगल या 10 फेब्रुवारी 2014 रोजी जॉईन झाल्या होत्या. त्यांची बदली केवळ चार महिन्यात म्हणजे 12 जुन 2014 रोजी झाली.  त्यांच्यावर टक्केवारीचे आरोप झाले असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. त्यामुळे मनिषा आव्हाळे यांच्यासमोर महिला अधिकारी म्हणून आव्हान राहणार आहे. 


यापूर्वी आव्हाळे यांना जिल्हा परिषदेमध्ये एक महिना सीईओ पदावर कामकाज केलेला अनुभव आहे. त्यावेळी जल जीवन मिशनच्या कामावर त्यांनी आपला फोकस केला होता. आव्हाळे या थेट आयएएस असल्याने त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे, त्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले उपक्रम त्याची सातत्य टिकवण्याचेही आव्हान आव्हाळे यांच्या समोर आहे. महसूल आणि ग्रामविकास विभागामध्ये कामकाजाची पद्धत वेगवेगळी आहे. ग्रामविकास विभाग हा थेट ग्रामीण जनतेच्या टच मध्ये असतो या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा कायम वावर असतो. 


सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या सहा विभाग हे प्रभारी अधिकाऱ्यांवर चालत आहेत तसेच कर्मचाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने अशा वातावरणात आव्हाळे यांना कामकाज करावे लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, समाज कल्याण, सामान्य प्रशासन या विभागाच्या कामकाज व कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे.

सिईओ मनिषा आव्हाळे यांनी स्वतः पार्किंग परिसरात चालत जाऊन कचरा डेपो ची पाहणी केली. ओला व सुका कचरा वेगळा करणेच्या

सुचना दिल्या. झाडांपासून पडणारा पाला पाचोळा पासून सेंद्रीय खत तयार करून आवारातील झाडे व कुड्यांतील रोपांना घालण्या बाबत सुचना दिल्या. प्रत्येक कार्यालयात होणार कचरा वर्गीकरण करणेचे सुचना दिल्या. कचरा जास्त होणार नाही याची काळजी प्रत्येक विभागाने घेतली पाहिजे अशा सुचना दिल्या. 

ग्रामीण पाणी पुरवठा विभागास भेट देऊन कार्यालयातील स्वच्छता, निटनेटकेपणा तसेच अभिलेख वर्गीकरण करणे बाबत सुचना दिल्या. या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. 

शिक्षण व आरोग्य विभाग, महिला व बाल  कल्याण विभाग व  ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व तेथील परिसराची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वानी कार्यालयीन वेळेत व वेळेवर कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, आपले दप्तर कपाटामध्ये सहा संच पद्धतीने ठेवणेत यावेत. कार्यालयात ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसेल तिथे स्वच्छता  करुन घ्यावी. कार्यविवरण नोंदवही अदयावत करावी, दत्पर वर्गीकरण करुन दत्पर अभिलेख कक्षाकडे पाठवावे, आपापल्या  विभागाच्या  अभिलेख कक्षाची स्वच्छता करुन घ्यावी. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर सीईओ दिलीप स्वामी यांची बदली ; सर्व स्तरातून आल्या या प्रतिक्रिया

Next Post

सोलापूरात MIM च्या आंदोलनाने वेधले लक्ष ; काळा मंडप घालून नोंदवला निषेध ; आम्हाला रिव्हॉल्वर जवळ ठेवण्याची परवानगी द्या….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात MIM च्या आंदोलनाने वेधले लक्ष ; काळा मंडप घालून नोंदवला निषेध ; आम्हाला रिव्हॉल्वर जवळ ठेवण्याची परवानगी द्या....

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2004065
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group