राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यातील सर्व दुकाने व्यापार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार 15 ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे मात्र ज्या जिल्ह्यात परिस्थितीप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा असे त्या आदेशात नमूद होते.
त्या पद्धतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माढा पंढरपूर करमाळा सांगोला माळशिरस या पाच तालुक्यात संचारबंदी कायम ठेवली आहे मात्र इतर सहा तालुक्यांमध्ये निर्बंध उठवण्यात आले असून सर्व दुकाने उपहारगृह हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत. जिल्हाधिकार्यांचा आदेश काय आहे पहा






















