रविवारी 15 ऑगस्ट भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस. सोलापूर शहरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण करण्यात होते. स्वातंत्र्य दिन म्हंटल्यावर विविध संघटना, पक्ष, संस्था हे आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात, वैयक्तिक विषय असतील तर ते पालकमंत्र्यांच्या समोर मांडण्याची धडपड असते, काही जण आपल्या तक्रारीकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतात अशी कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असते,
जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठा बंदोबस्त असतो , कोण गोंधळ घालणारा कार्यकर्ता, संघटनेचा पदाधिकारी कुठून येतो का याकडे लक्ष असते. रविवारी सकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 9 वाजून 5 मिनिटाने ध्वजारोहण होते, पावणे नऊच्या सुमारास प्रवेशद्वारावर बंदोबस्त साठी उभे असलेले पोलीस हवालदार यांची नजर समोर गेली ते म्हणाले तो शेखर बंगाळे पहा कशासाठी आला आहे, काय तर गोंधळ घालायचा असे म्हणतात 4 पोलीस त्याच्याकडे गेले आणि त्याची विचारणा केली,
त्याला तिथून लगेच बाजूला करण्यात आले. शेखर बंगाळे सांगत होता, मी केवळ निवेदन घेऊन आलोय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे, मला निवेदन देऊ द्या, मात्र कुणीही त्याचे ऐकले नाही, तो काय तरी प्रकार करेल म्हणून त्याला लगेच हटवण्यात आले. देशमुख पोलीस हे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात बंदोबस्ताला कायम असतात, त्यामुळे स्वातंत्र्य दिनी त्यांचा अलर्टपणा नक्कीच दिसून आला.


















