सोलापूर -उत्तर सोलापूर तालुक्यातील पाऊस खंडामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले असून पंचनामा करून पीक विमा व शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, सुरक्षेसाठी डीपी मधील फ्युज व बॉक्स दरवाजे बदलावे व तालुक्यातील चोऱ्या रोखण्यासंदर्भातयुवा मंचचे मार्गदर्शक पृथ्वीराज माने त्यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहशीलदार यांनी पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून तातडीने अहवाल पाठवू असे सांगितले.
पृथ्वीराज माननीय युवा मंचच्या वतीने युवा मंचचे मार्गदर्शक पृथ्वीराज माने यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार उत्तर सोलापूर, तालुका कृषी अधिकारी विज महामंडळाचे अधीक्षक अभियंता व पोलीस अधीक्षक यांना भेटुन विविध मागण्याचे निवेदन दिले यावेळी युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, सभापती रजनी भडकुंबे, समन्वयक अजित पाटील, उमेश भगत,सचिव तात्या कदम आदी उपस्थित होते.
उत्तर सोलापूर तालुक्यात प्रारंभी पाऊस झाल्याने खरीप पेरणी मोठ्या प्रमाणात झाली मात्र पंचवीस -तीस दिवस पाऊस न पडल्यामुळे सोयाबीन, मूग,उडीद, मका, तूर इत्यादी पिकाचे मोठे नुकसान झाले पाऊसखंड कालावधी पाहता तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले असले तरी अहवाल पाठवून शेतकऱ्यांना विमा कंपनी व शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जयवंत पाटील व तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांना देऊन चर्चा केली. त्यावेळी त्यांनी तातडीने पंचनामा करून अहवाल पाठवला जाईल असे सांगितले.
तालुक्यातील रोहित्रला (डीपी )फ्युज नाहीत, बॉक्सला दरवाजे नाहीत तर अनेक शेतात तारा लोंबकाळत आहेत पावसाळा सुरू असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे तरी तातडीने कामे हाती घेण्याची मागणी विज महामंडळाचे प्र.अधीक्षक अभियंता एस आर शिंदे यांना देण्यात आले यावेळी शहरचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे होते. यावेळी आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काम हाती घेतो मात्र शेतकरी यांनीही विज बिल भरून सहकार्य करण्याचे सांगितले.
उत्तर सोलापूर तालुक्यात कोरोना नंतर बिबट्याची भिती ओसरत असताना आता चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे दुभती जनावरे चोरी जात असून दिवसादेखील चोऱ्या होत असल्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी आम्ही दक्षता घेत असल्याचे सांगून आपण गावात ग्रामसुरक्षा दल सीसीटीव्ही कॅमेरे,भोंगा यांचा अवलंब करुन सहकार्य करावे असे सातपुते यांनी सांगितले.
यावेळी युवराज जगताप,भैय्या पाटील, अाेंकार शिंदे, विनोद माने, इरफान पठाण, सचिन ढेपे, कमलाकर भोसले , तुकाराम पवार ,किरण बंडगर ,अमित भडकुंबे ,सुरज पाटील,ओंकार केंगार, मंजुश्री भोसले, प्राजक्ता टेकाळे, रेश्मा कदम, शहाजी भोसले, सागर तांबे आदि जण उपस्थित होते.


















