Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किसन जाधव यांच्या वाढदिनी सर्वपक्षीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव ; अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी जाधव यांनी घातले दंडवत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुर : प्रचंड ध्येयवाद अविरत कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आव्हानांना तोंड देण्याचे वृत्ती यामुळे अल्पावधीत सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसान जाधव यांनी जनमानसात आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. संवेदनशील नेता कसा असावा याचा आदर्श वस्तू पाठ जाधव यांनी सोलापूरकरांना घालून दिला.  दुर्बल,वंचित, बहुजन समाजाला राष्ट्रवादी पक्षाशी जोडण्यात आणि पक्षाशी बांधून ठेवण्यात किसन जाधव यांनी बजावलेल्या भूमिकेने पक्षाची ताकद आणखीन वाढली आहे. प्रभागाचा विकास हाच एकच ध्यास हे मनी धरून सर्वाधिक निधी शासन स्तरावरून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास त्यांनी साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कुशीत तयार झालेले खंबीर नेतृत्व म्हणजेच किसन जाधव असल्याचे गौवोद्गार  पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आयोजित किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी काढले.

दरम्यान सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती किसन जाधव म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने आजपर्यंत आपण अविरत काम करत आहे. या भागातील मतदारराजांनी आम्हाला तीन टर्म सेवा करण्याची संधी दिली. यापुढील काळात देखील अशीच संधी जनसेवेसाठी द्यावी तसेच अजित दादांच्या आशीर्वादाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादा विराजमान व्हावे यासाठी किशन जाधव यांनी चक्क व्यासपीठावरून दंडवत घालत जनतेची व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी किसन जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक 22 येथे इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर पुणे राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने, उद्योजक कुमार करजगी, यशराज साळुंखे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, इरफान शेख, प्रसाद लोंढे, टकारी समाज युवक संघटना अध्यक्ष विनोद जाधव, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तौफिक शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता रोटे, अश्विनी चव्हाण, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, मेनका सरकार, शशिकला कस्पटे, रुक्मिणी जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, चेतन गायकवाड, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव, ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य आदींची उपस्थिती होती.

किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी महापौर महेश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळींनी भ्रमणध्वनीद्वारे किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आयोजित कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण मोठ्या थाटात करण्यात आला. दरम्यान आयोजित कबड्डी स्पर्धेतील स्वराज्य स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकविल्याने संघास वीस हजार 63 रुपये रोख आणि चषक प्रथम पारितोषक देण्यात आले तर उपविजेता संघ पटकाविलेल्या अंजुमन क्रीडा संघास पंधरा हजार 63 रुपये आणि अजित दादा चषक आणि तृतीय क्रमांक पटकाविलेल्या श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब यास दहा हजार 63 रुपये आणि अजित दादा चषक प्रदान करण्यात आले. महिलांच्या गटात एकता स्पोर्ट्स क्लब आणि कुमारी स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना झाला या सामन्यांमध्ये एकता स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद रुक्मिणी स्पोर्ट्सने पटकाविला. या संघात सात हजार 63 रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले.

 या संपूर्ण स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून संतोष जाधव यांनी विशेष भूमिका बजावली तर या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाही मदन गायकवाड निरीक्षक म्हणून मरगु जाधव, एल एस जाधव, मोहन जाधव, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड, प्रकाश जाधव यांनी काम पाहिले. मोठ्या खेळीमेळी वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेची सांगता करण्यात आली. दरम्यान सत्कार सोहळ्याप्रसंगी एकच वादा अजित दादा अशा घोषणाने अवघा परिसर राष्ट्रवादीमय झाले होते. 

SendShareTweetSend
Previous Post

बळीराम सर्वगोड जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष ; सरचिटणीस सचिन जाधव तर खजिनदारपदी संदीप येरवडे

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर झेडपी सीईओ पीए शिवानंद मघे यांची उचलबांगडी ; सुधाकर माने देशमुख नवे स्वीय सहायक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर झेडपी सीईओ पीए शिवानंद मघे यांची उचलबांगडी ; सुधाकर माने देशमुख नवे स्वीय सहायक

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999005
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group