सोलापूर : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील ३४ गटविकास अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या गुरुवारी केल्या आहेत. त्यात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांची अहमनगर जिल्हयातील श्रीगोंदा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोरख शेलार हे मागील आठ महिन्यांपूर्वी पाणी व स्वच्छता विभागात नियुक्ती झाली होती, केवळ आठ महिन्यात त्यांची बदली झाली, त्यांनी विनंती बदली घेतली असल्याचे समजले. स्मिता पाटील या माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी होत्या. त्या आता मुख्यालयात पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.



















