मुंबई पक्ष कार्यालयात संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरांच्या विकासाच्या प्रलंबित विषयांची माहिती जाणून घेतली, त्या बैठकीला सोलापूर शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची उपस्थिती होती, बागवान यांनी सोलापूर शहराला पाणीटंचाईची मोठी समस्या आहे, या समस्येवर त्यांनी मत मांडले.
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारी टाकळी ते सोलापूर ही पाईपलाईन 65 वर्ष जुनी असून अनेक ठिकाणी गळती आहे, ती कधी ही बंद पडू शकते जर बंद पडली तर सोलापूरकरांना जलसंकटला सामोरे जावे लागणार आहे. त्यावर ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, अशी माहिती जुबेर बागवान दिली तो विषय स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहून घेतला,


















