सोलापूर काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदावर डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांची 26 ऑगस्ट रोजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव वेणुगोपाल यांनी निवड केली. डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या निवडीने काँग्रेसच्या एका गोटात तीव्र नाराजी असतानाच दुसरीकडे मात्र काही युवा नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर चार सप्टेंबर हा काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस त्या वाढदिवसा दिवशीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांना जिल्हाअध्यक्ष निवडीचे पत्र मिळाले. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या समर्थकांसह हे पत्र नाना पटोले यांच्या हस्ते स्वीकारले यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा नूतन जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सोलापुरातील काँग्रेस भवन मध्ये येऊन धवलसिंह मोहिते हे जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार कधी येतात याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





















