Friday, June 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादीने महापालिकेचे रणशिंग फुंकले ; अण्णांच्या गळ्यात शेला मात्र पैलवानने प्रोटोकॉल पाळला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



येणाऱ्या सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील जनतेसोबत राष्ट्रवादी पदाधिकारी नेते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संवाद करण्याच्या उद्देशाने शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष  पवार यांच्या संकल्पनेतून प्रभाग निहाय जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 1 मड्डी वस्ती येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


यावेळी शुभारंभ प्रसंगी शहराध्यक्ष भारत जाधव यांनी 2022 मध्ये होणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले असून कोणत्याही परिस्थितीत महापालिका मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणून राष्ट्रवादीचाच महापौर करायचा असा चंग सर्व पदाधिकाऱ्यांनी बांधला असल्याचे सांगितले.


कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी संबोधित करताना सांगितले, सध्याच्या स्थितीला शहरात राष्ट्रवादीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू असून शहरात १३०० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने एक वेगळेच वातावरण तयार झाले असून ते पक्षाच्या दृष्टीकोनातून सकारात्मक असल्यामुळे जनतेचा विश्वास मिळवून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे.


यानंतर मार्गदर्शनपर भाषणात माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर मनोहर सपाटे तसेच प्रभागातील वकील सेलचे अंकलगी यांनी देखील उत्तर विधानसभा मधील भाजपा आमदार यांनी अशाप्रकारे जनतेला फसविले जनतेची कोणतीच कामे केली नसल्याचे सांगत येणाऱ्या काळात राष्ट्रवादीवर जनतेने पूर्ण विश्वास टाकून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या म्हणून विशेष आवाहन केले.


राष्ट्रवादीच्या या जनसंवाद यात्रेला नगरसेवक तोफिक शेख व नगरसेवक तथा माजी महापौर महेश अण्णा कोठे यांची लक्षणीय उपस्थिती राहिली. यावेळी तौफिक शेख यांनी विशेष नमूद करताना सांगितले, राष्ट्रवादीचे आम्ही सर्व नेते पदाधिकारी हे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेचा विश्वास संपादन करून महापालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता मिळवणारच असा दावा केला.


माजी महापौर महेश कोठे यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल बोलताना गेल्या ५ वर्षात सोलापूर महानगरपालिकेमध्ये फसव्या भाजपाची सत्ता कशाप्रकारे जनतेसाठी त्रासदायक ठरत असून गेल्या ४ वर्षात एकदाही शहराचे बजेट सत्ताधिकाऱ्यांना मांडता आले नाही की स्मार्ट सिटीच्या नावाखाली कसा भोंगळ कारभार महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाकडून चालला आहे याचे उदाहरण देताना जनतेच्या डोळ्यात भाजपाकडून कशाप्रकारे धूळ फेकली जात आहे ते सांगताना स्मार्ट सिटी चे एखादे काम भाजपाच्या नगरसेवकाच्या किंवा जवळच्या नातेवाईकांना ठेकेदारी स्वरूपात द्यायचे, अर्धवट कामे करायची, चुकीची बिले काढायची, पैसे लाटायचे आणि पुन्हा ती कामे झाली नाहीत म्हणून भाजपाच्याच नगरसेवकांनी बोंबा मारायच्या असा फसवा खेळ सध्या शहरात चालू असून अशा या मुजोर सत्ताधारी पक्षाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरचा रस्ता दाखवून शरद पवार साहेब हे ज्याप्रमाणे दिलेला शब्द पाळतात त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या उपस्थित सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वरती विश्वास ठेवून जनतेने जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून देऊन महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यासाठी दंड थोपटले.


रविवारपासून सुरू झालेली ही जनसंवाद यात्रा रोज एका प्रभागात आयोजित करण्यात येणार असून शहर उत्तर दक्षिण मध्य विधानसभा मतदार संघात नियुक्ती केलेले सर्व पदाधिकारी हे तेथील कार्यकर्त्यांसमवेत व नागरिकांशी संवाद साधणार असून नागरिकांच्या हिताची कामे देखील करण्यासाठी बांधील असल्याचे शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वक्ता सेलचे शहराध्यक्ष नागेश निंबाळकर तर आभार प्रदर्शन पर्यावरण सेल शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी केले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद्माकर काळे, अजित बनसोडे, अनिल बनसोडे, शफी इनामदार, लता फुटाणे, बाबासाहेब जाधव, लता ढेरे, मिलिंद गोरे, अमीर शेख, तनवीर गुलजार, निशांत सावळे, बसवराज कोळी, हरी पवार, रवींद्र सरवदे, गफूर शेख, सरफराज शेख, रुपेश भोसले, प्रमोद भोसले, चेतन गायकवाड, सागर शितोळे, युवराज माने, ज्योतिबा गुंड, आशिष जेटीथोर, चंद्रकांत पवार, महिपती पवार, अमोल कुलकर्णी, आयुब पठाण, गौरव जक्कापुरे हे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रभाग 1 मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिद्धेश्वर अंबट, प्रकाश झाडबुके, शिवराज विभुते, शशी डोलारे, अजित साळुंखे, संजय जाबा, मोबीन भेलमे, मोहम्मद जीना शेख, अफरिन पटेल, उमर दलाल, अभिषेक बच्चल, मंगल सोनकांबळे, रवि गुब्याडकर, लक्ष्मण विटकर, अमोल कळम, श्रीकांत गायकवाड, विशाल वरगंती, शिवराज वळसंगकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने पावसात देखील उपस्थित होते.

.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार ताई, आम्हाला विकास काय सांगू नका आधी”शहर मध्य”ची अवस्था सुधारा ; भाजपच्या नेत्याने डागली तोफ पहा हा व्हिडीओ

Next Post

ब्रेकींग ! सीना नदीला पूर ; पाकणीचा पूल पाण्याखाली पहा पुराचे व्हिडीओ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! सीना नदीला पूर ; पाकणीचा पूल पाण्याखाली पहा पुराचे व्हिडीओ

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982148
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group