सोलापूर : जिल्ह्यात राजकीय जुळवाजुळव करण्यात मास्टर माईंड असलेले नेते करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे अनेक दिवसांनंतर सोलापूर शहरात आले होते, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात त्यांनी झेडपी अतिरिक्त सीईओ, दोन महिला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार केला याठिकाणी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने ही आपल्या कामानिमित्त संजयमामा यांची भेट घेतली,
नंतर ते पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात आले जिल्हाधिकारी शंभरकर मुंबईत असल्याने त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची भेट घेतली, त्याठिकाणी त्यांना भेटण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आल्या मागोमाग तहसीलदार अंजली मरोड आल्या, संजयमामानी संजीव जाधव सह शमा पवार, अंजली मरोड या तिघांचा सत्कार केला,
त्यानंतर मामांचा ताफा संतोष भाऊ आणि आनंद दादांना घेऊन तौफिक पैलवान यांच्याकडे निघाला. त्याठिकाणी तौफिक शेख यांचे चिरंजीव अदनान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून तिथे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यावेळी पत्रकारांनी चंदनशिवे, शेख यांच्या प्रवेशाबद्दल विचारले असता ते काय म्हणाले पहा




















