सोलापूर जिल्हा परिषदेतील माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेची सुनावणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुरू आहे मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती.
मोहिते पाटील गटाने प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जे कागदपत्रे सादर केले नाहीत,पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा अर्ज दिला होता तो नामंजूर करण्यात आला त्या निकालाच्या विरोधात मोहिते-पाटील गट उच्च न्यायालयात गेला आहे.
या प्रकरणाची सुनावणी मंगळवार 7 सप्टेंबर रोजी होती दरम्यान जिल्हा परिषद सदस्य शितलदेवी मोहिते-पाटील यांचा अकलूज जिल्हा परिषद गट नगरपालिकेमध्ये वर्ग झाल्याने त्यांचे नाव तक्रारी मधून वगळावे असा अर्ज देण्यात आला होता मात्र त्यास तक्रारदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी हरकत घेतली अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी शितलदेवी मोहिते या जिल्हा परिषद सदस्य होत्या तो दिवस महत्वाचा आहे, त्यामुळे जिथून निकाल होईल तिथून अपात्रता लागू होते का नाही? म्हणून त्यांचे नाव वगळू नये असे तक्रारदार यांचे वकील ऍड इंद्रजित पाटील यांनी सांगितले.
मोहिते पाटील गटाचे ऍड घोडके यांनी सांगितले, आम्ही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आमचा अर्ज फेटाळला त्या निकाला विरोधात उच्च न्यायालयात गेलो त्याचे सबमिशन केले, ती प्रोसेस जिल्हाधिकाऱ्यांनी विचारात घेतली, आम्हाला या प्रकरणात पुरावा द्यायचा आहे त्यासाठी आम्ही मुदत मागितली, ती मान्य करत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 7 दिवसाची मुदत दिली असून 14 सप्टेंबर रोजी सुनावणी आहे, नियमानुसार जी कारवाई आहे त्यानुसार आम्ही पुढे जाऊ.


















