Wednesday, September 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

यंदा महापौर पदाची संधी आपलीच,तशी तयारी करा ; या नेत्याने दिल्या पदाधिकाऱ्यांना सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : यंदा एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किमान दोन अंकी नगरसेवक निवडून येतील आणि महापौर पदाचा  दावेदार बनतील असा विश्वास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी काल सांयकाळी माकपचे  मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे झालेल्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना व्यक्त केले. 

बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे जिल्हा सचिव मंडळ सदस्य युसूफ शेखमेजर  यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण सभा पार पडली.ही सर्व साधारण सभा प्रामुख्याने आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने घेण्यात आली असून याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

सनी शेट्टी, सिद्धप्पा कलशेट्टी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारा निवडणूक कार्यालयचे फॉर्म 6,7,8 व 8 अ ची माहिती सोबत  नवीन मतदार नोंदणी,नाव दुरुस्ती, पत्ता बदल याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.   

असंघटीत कामगारांची नोंदणी इ श्रम या पोर्टलवर करण्यासंबंधी माहिती सिटू चे राज्य सचिव सलीम मुल्ला यांनी दिली.

कॉ.आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग पद्धतीवर सध्या संभ्रम आहे निवडणूक आयोगाने एक सदस्य प्रभाग पद्धतीची कच्चा आराखडा तयार करून पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र एक सदस्य प्रभाग झाल्यास किमान दीड हजार तर दोन सदस्य प्रभाग रचना झाल्यास किमान तीन हजार मते विजयासाठी लागतील असे आडम मास्तर यांनी सांगितले, सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सक्षम,अभ्यासू,लढाऊ व शहराच्या विकासाची अंतरीक तळमळ असणाऱ्या व्यक्तींना नगरसेवक म्हणून आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी.अन्यथा विकासा ऐवजी भकास होईल. 

महानगरपालिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी नसून नागरीक आणि शहर विकासाची राजधानी आहे याचे महत्व व गांभीर्य मतदार बांधवानी लक्षात घ्यावे असे ही ते पुढे म्हणाले.  

27 सप्टेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने सार्वत्रिक भारत बंद ची हाक देण्यात आली असून शेतकरी बाबत तीन कृषी काळे कायदे रद्द करा, तीन श्रम संहिता रद्द करा युवकांना नोकरी व रोजगार द्या, ऑनलाइन शिक्षण पद्धती रद्द करा. अशा अनेक न्याय हक्काच्या मागण्या घेऊन होणाऱ्या भारत बंद मध्ये सहभागी व्हा असे आवाहन माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी केले.

व्यासपीठावरअँड.एम.एच.शेख, माकपच्या नगरसेविका कॉ.कामीनीताई आडम,सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर,सलीम मुल्ला,अनिल वासम उपस्थित होते.  सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ.अनिल वासम यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

कलेक्टर शेतात, सीईओ शाळेत, एसपी परिवर्तनात मात्र पालिका कमिशनर कार्यालयातच; डेंग्यूने लोक मारताहेत, शिवशंकर तिसरा डोळा कधी उघडणार

Next Post

आदिवासी विकास कार्यालयाला आलं “घरपणं” ; प्रशस्त कार्यालयात कामकाज सुरू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आदिवासी विकास कार्यालयाला आलं "घरपणं" ; प्रशस्त कार्यालयात कामकाज सुरू

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000297
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group