Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपला मिळाला इन शर्ट करणारा शहराध्यक्ष ; नरेंद्र काळे यांचा जोरदार पदग्रहण समारंभ ; कार्यकर्त्यांना केले हे भावनिक आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 July 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आजकाल सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पांढराशुभ्र किंवा खादी कपड्याच्या विजार पायजमामध्ये पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात एका पक्षाचा जर शहराध्यक्ष असेल तर त्याचा तोरा वेगळाच असतो. कडक स्टार्च केलेले कपडे असा पेहराव अलीकडच्या राजकीय कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो. परंतु भारतीय जनता पार्टीचे नव्याने झालेले शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा शनिवारी पदग्रहण समारंभ संपन्न झाला ते पांढरा शर्ट व काळी पँट अशा अतिशय साध्या सिम्पल अशा ड्रेसमध्ये दिसून आले. त्यांचा ड्रेस हा इन शर्ट केलेला होता या ड्रेसची कार्यकर्त्यांमधून चर्चा ऐकण्यास मिळाली.

भारतीय जनता पार्टीचे नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभ शनिवारी सायंकाळी शांतीसागर मंगल कार्यालयात ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे होते. कार्यक्रमास माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नु, प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती मावळते अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडून नूतन अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. सुरेश पाटील यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठे पद आहे. पक्षासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी निस्वार्थपणे काम करणारा कार्यकर्ता घडवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे. आगामी महानगरपालिका विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व जागांवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी सामूहिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळणार आहे, असे सांगून त्यांनी अडचणी अनेक आहेत. परंतु त्यासर्वांवर मात करून भाजपच्या वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांच्या सहयोगातून सोलापूर शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून येतील अशी गर्जना काळे यांनी केली.

भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनेकदा लाठ्या खाल्ल्या, रक्त सांडले, जीवाचे रान केले. त्याचे फळ म्हणून संपूर्ण देशात आज भाजपची सत्ता दिसत आहे. मला कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला पक्षाने मानाचे स्थान दिले आहे. आगामी काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचेही शहराध्यक्ष नरेंद्र काळे यावेळी म्हणाले.

माजी मंत्री दिलीप कांबळे म्हणाले, भाजपाची घोडदौड संपूर्ण देशभरात सुरू आहे. आगामी काळातही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेची जागा मागीलपेक्षा दुप्पट मतांनी जिंकू, असा विश्वासही माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त शहर उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील आणि दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपाचे सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांनी प्रास्ताविक तर प्रा. नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी माजी सभागृह नेता संजय कोळी, शहर उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख राजकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी देविदास चेळेकर, परिवहन समितीचे माजी सभापती जय साळुंके, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा इंदिरा कुडक्याल, श्रीकांत घाडगे, राम वाकसे, विनोद मोटे, श्रीरंग गवई, समीर देशपांडे, सतिश महाले, प्रेम भोगडे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सात दिवस जिल्हाधिकारी जाणार घरोघरी ; ग्रामीण भागावर राहणार सर्वाधिक फोकस

Next Post

सोलापुरात भर पावसात भिजत भिडेंचा निषेध ; भिडेला लाज वाटत नाही का? आमचा देश सोडून का जात नाही ; प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात भर पावसात भिजत भिडेंचा निषेध ; भिडेला लाज वाटत नाही का? आमचा देश सोडून का जात नाही ; प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group