सोलापूर : येणाऱ्या डिसेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांची विधान परिषद निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून आमदार प्रशांत परिचारक निश्चित मानले जातात. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी कडून माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांच्या नावाची चर्चा ऐकण्यास मिळते, मात्र दिलीप माने यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.
हा आमदार जिल्हा परिषद सदस्य, महापालिका नगरसेवक, नगरपालिका नगरसेवक, पंचायत समिती सभापती यांच्या मतदानातून निवडला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सुमारे साडेचारशेच्या आसपास मतदार आहेत. यामुळे याच क्षेत्रातला आमदार यांचा झाला पाहिजे असा सुर जिल्हा परिषदेमध्ये ऐकण्यास मिळतो आहे, त्यासाठी झेडपीत आघाडी करण्याचे नियोजन अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी बोलून दाखवले होते.
सोमवारी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना यंदाची विधानपरिषद निवडणूक मी लढवणारच अशी घोषणा केली. मला शेकापचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे निश्चित आमदारकीसाठी हवे ते पाठबळ देण्याचे आश्वासन जयंत पाटलांनी दिलंय या निवडणुकीसाठी अपेक्षित तेवढी रक्कम खर्च करण्याची तयारी देशमुखांनी दर्शवली, आयुष्यामध्ये आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही त्यामुळे यंदा काही करून विधान परिषद लढवणारच अशी भाषा सचिन देशमुख यांनी बोलून दाखवली.
2019 च्या विधानसभेसाठी इच्छुक होतो मात्र आर्थिक अडचणीमुळे मी ती निवडणूक लढवू शकलो नाही आणि विधान परिषद निवडणूक ही केवळ पैसे वाल्यांनी लढवावी असे कुठे सांगितले आहे का? सर्वसामान्य कार्यकर्ता ही निवडणूक लढवू शकतो. विधान परिषदेच्या सुमारे साडेचारशे मतदारांपैकी 190 मतदार हे ओबीसी समाजातील आहेत जर त्यांची एकजूट झाली तर निश्चित पैसे खर्च न करता ही आमदार निवडून येईल त्यासाठी जिल्हा परिषदेतील अनेक सदस्य मला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
महापालिका आयुक्तांनी का मानले सोलापूरकरांचे आभार पहा व्हिडीओ


















