सोलापूर : शेतकऱ्यांची परवानगी न घेता परस्पर 15 लाखाचे कर्ज त्याच्या नावे काढून फसवणूक केल्या प्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावातील गोकुळ शुगरचे व्यवस्थापकीय संचालक दत्ता बलभीम शिंदे यांच्यासह कुंभार वेस इथल्या युनियन बँकेच्या शाखा व्यवस्थापक वी वी राजशेखर यांच्या विरोधात जोड भावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन सिद्रामप्पा मोरडे राहणार मुस्ती या शेतकऱ्यांने ही फिर्याद दिली आहे.
गोकुळ साखर कारखान्याचे एमडी दत्ता शिंदे व युनियन बँक मॅनेजर राजशेखर यांनी संगनमत करुन 20 एप्रिल 2021 पूर्वी फिर्यादीचे व लोकांचे परस्पर खोटे दस्त तयार करुन त्यावर खोटया सहया करुन युनियन बैंक ऑफ इंडिया कुंभार वेस सोलापुर बँकेकडुन एकुण १५ लाख रुपये कर्जाचे रक्कम मंजुर करुन वापरुन समाजा मध्ये फिर्यादी व इतर कर्ज बुडवे आहे अश्याप्रकारचे संभावणा होवुन बदनामी करुन फसवणुक केली आहे. तपास हवालदार इंगळे हे करत आहेत.















