सोलापूरच्या राजकारणात एमआयएम पक्ष आल्याने काहीसा मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दूर गेला असला तरी सुशीलकुमार शिंदे साहेबांवरील मुस्लिम समाजातील नेत्यांचे प्रेम आजही तेवढेच कायम आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला विविध माध्यमांवर झळकलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम समोर आले. बऱ्याच जाहिरातींमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मन्सूर गांधी यांचा फोटो दिसत होता,
शिंदेसाहेबां वरील आपलं प्रेम मन्सूर गांधी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुवारी व्यक्त केले, शिंदे साहेबांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी विशेष करुन काँग्रेस मधील मुस्लिम समाजातील नेत्यांनी सत्काराचे आयोजन केले होते.तब्बल सहा फुटाचा केक यावेळी आणण्यात आला, केक पाहून शिंदे अवाक झाले, यावेळी जंगी सत्कार करण्यात आला. मन्सूर गांधींचा सत्कार पाहून साहेब भारावले,
तसेच यावेळी शकील मौलवी, नगरसेवक शिवा बाटलीवाला, वाहिद विजापुरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश वाले, सुरेश हसापुरे, आरिफ शेख, बाबा मिस्त्री, शौकत पठाण, शकील मौलवी, संजय हेमगड्डी, मन्सूर गांधी, तोफिक हत्तुरे, वाहिद विजापूरे, नैरुद्दीन मुल्ला, हरीश पाटील, शिवा बाटलीवाला,अनुराधा काटकर, चेतन नरोटे, प्रवीण निकाळजे, मुबिन सय्यद, बसवराज म्हेत्रे, यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.















